Bachchu Kadu Assembly Election Plan saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election: बच्चू कडूंचा डाव, महायुतीचा पाडाव? विधानसभेसाठी करणार शेतकऱ्यांशी आघाडी

Bachchu Kadu Assembly Election Plan: प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलंय. बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नवा प्लान बनवलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच पक्ष कामाला लागलेत. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीला मित्रपक्षांना सोबत ठेवताना मोठी कसरत करावी लागतीय. मात्र आता महायुतीचा घटकपक्ष असलेल्या बच्चू कडूंनी आता महायुतीचं टेंशन वाढवणारा निर्णय घेतलाय. बच्चू कडूंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट शेतकरी नेते राजू शेट्टी, रवीकांत तुपकरांसह मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही साद घालत तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत..

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बच्चू कडू 9 ऑगस्टला क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमधून सरकारविरोधात एल्गार पुकारणार आहेत. त्यानंतर आपली भूमिका ठरवणार असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय. राज्यातील सत्तांतरापासून बच्चू कडूंना मंत्रिपदाची आशा होती. मात्र विधानसभा निवडणूक आली तरी बच्चू कडूंना मंत्रिपदापासून उपेक्षित रहावं लागलं. त्यातच लोकसभा निवडणूकीपासून बच्चू कडूंचे सूर बदलले आहेत. त्यामुळे बच्चू कडूंनी राज्यात शेतकऱ्यांची आघाडी स्थापन करून मनोज जरांगेंसह मोट बांधली तर महायुतीचं टेंशन वाढणार आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी केलेल्या आवाहनाला जरांगेंसह शेतकरी नेते काय प्रतिसाद देतात? यावरून आगामी काळातील सत्तेचं समीकरण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT