Bachchu Kadu SaamTv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: दोन महिन्यानंतर हे भाऊ सावत्र होतील; लाडकी बहिणी योजनेवरून बच्चू कडू यांची कोपरखळी

Bharat Jadhav

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

तिसरी आघडी स्थापन करून महायुतीला आव्हान देणाऱ्या बच्चू कडू यांनी लाडकी बहिणी योजनेवरून सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय ठरलीय. मात्र ही योजना फक्त दोन महिने चालेल, अशी टीका विरोधक करत असतात. आता बच्चू कडू यांनीही महायुती सरकारवर टीका केलीय. आज बच्चू कडू यांनी दिव्यांग लोकांच्या योजनेच्या पैशांसाठी आंदोलन काढले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर आंदोलन असतांना पोलिसांनी आंदोलन अडलवलंय.

लाडकी बहिणीसाठी पैसे दिले जातात. कारण त्यांना माहीत आहे. वयस्कर, दिव्यांग ना काही दिले नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांना बहिणींची मदत लागेल, पण भाऊ नाराज आहेत ना. हे लोक पण दोन महिने देतील आणि मग सावत्र भाऊ होतील,अशी टीका बच्चू कडू यांनी केलीय. महायुतीतून बाहेर पडला म्हणून टीका करत आहात का? असा सवाल केला असता.

बच्चू कडू म्हणाले. मी तिसरा आघाडीत आल्यापासून शक्ती प्रदर्शन करतोय अशातला भाग नाही. शक्तिप्रदर्शन करणार नाही तर मग मी काय जेवण बनवणार का घरी? यादी देखील मी संभाजीनगरला मोठा मोर्चा काढला होता त्यावेळेस मी सत्तेमध्येच होतो.

दिव्यांगासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्यावरून सरकारला धारेवर धरलंय. गेल्या तीन महिन्यापासून पैसे नाही दिव्यांगांना पैसे मिळाले नाहीत. त्यावरून तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. केंद्रातून राज्यात योजना जाहीर होतात. पण त्या पोहोचत नाही. कारण प्रशासनाचा जरब नाही. दरारा नाही. यांचे दौरे ठरलेले असतात. मंत्रालयातील मंत्र्यांकडे ६ ते ७ खाती आहेत. उदय सामंत वेगवेगळ्या विभागाची उत्तर लक्षात येते मध्ये लिहिताना दिसून येतात.

इतकी खाती असल्यावर कुठल्या खात्याबाबत कुठला निर्णय घ्यायचा याबद्दल त्यांना कळत नाहीये. सरकरवर टीका करताना म्हणाले, अजितदादा यांनी सांगितलं होतं की पाच तारखेपर्यंत कोणाला पैसे मिळाले नाहीत तर माझ्या कर्मचाऱ्यांचेही पैसे मी देणार नाही आता त्यांच्या घराबाहेर मी बोर्ड घेऊन उभा राहणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट

Pune Tourist Place : डोळ्यांचं पारणं फेडणारा अद्भुत असा कोकण दिवा किल्ला!

PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग; अवघ्या ३ तासात १२४ मिलिमीटर पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, सोसायटीमध्ये शिरलं पाणी

laxman hake : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्यानतंर लक्ष्मण हाकेंनी सोडलं उपोषण, VIDEO

SCROLL FOR NEXT