Bachchu Kadu Saam TV
महाराष्ट्र

Bachchu Kadu: '...तर विधानसभा लढवणार नाही, माझी जागा महायुतीला सोडणार', बच्चू कडूंची सर्वात मोठी घोषणा! पाहा VIDEO

Maharashtra Politics Breaking News: १८ मागण्या मान्य झाल्या तर तर मी विधानसभेची निवडणूक न लढता माझी जागा महायुतीला सोडेन, अशी सर्वात मोठी घोषणा प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. १४ जुलै २०२४

'१९ तारखेला महायुती व सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार व त्यांनी जर आमच्या मागण्या केल्या तर मी निवडणूकीतून माघार घेऊन माझी जागा महायुतीला देणार.' असल्याची सर्वात मोठी घोषणा प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले बच्चू कडू?

"आम्ही राज्यातील महायुती सरकारला आमच्या मागण्यांचे पत्र देणार आहोत. शेतकरी, दिव्यांगाबाबतच्या या मागण्या आहेत. या मागण्या जर मान्य झाल्या तर मी विधानसभेची निवडणूक न लढता माझी जागा महायुतीला सोडेन," अशी सर्वात मोठी घोषणा प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

"पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावा, शिक्षण आणि आरोग्यामधील गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या 18 प्रकारच्या मागणी सरकारपुढे ठेवू," असे ते म्हणाले.

तसेच "मी महायुतीमध्ये नाही, कोण सांगितले तुम्हाला मी महायुती मध्ये आहे? असं स्पष्टीकरण देत आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची पहिली आघाडी तयार करू. आमच्यानंतर त्यांची आघाडी आहे," असे महत्वाचे विधानही बच्चू कडू यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Update: WhatsAppमध्ये मोठा बदल, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी आले खास फिचर, वाचा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana : लाडकीचा लाभ घेणाऱ्यांपैकी ८३ टक्के महिला विवाहित, तर फक्त ४.७ टक्के विधवा, आकडेवारी आली समोर

Famous Singer Threat Call: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; फोनवरून दिला सावध राहण्याचा इशारा

Viral Video: बोलता बोलता अचानक खाली कोसळली महिला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Vatana Batata Bhaji Recipe: गुढीपाडव्याला पुरी सोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल वटाणा बटाटा भाजी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT