Bacchu kadu  Saam Tv
महाराष्ट्र

महापुरुषांबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर रट्टा दिलाच पाहिजे; बच्चू कडूंचा MVAच्या महामोर्चाला पाठिंबा?

महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढला जात असेल तर ते चांगलंच आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Bacchu Kadu : महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत शनिवारी 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व महाराष्ट्र प्रेमींना या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे. या मोर्चाला आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

महापुरुषांबद्दल जो कुणी जाणूनबुजून वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिलाच पाहिजे, असं आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये म्हटलं आहे. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढला जात असेल तर ते चांगलंच आहे, असं देखील ते म्हणाले.  (Latest Marathi News)

शब्द चुकने आणि जाणून-बुजून बोलणं यात मोठा फरक आहे. तो कोणत्याही पार्टीचा असो,पदाचा असो त्याला रट्टा दिलाच पाहिजे. पण जाणून बुजून न बोलता जर त्याचं कोणी राजकारण करत असेल ते महापुरुषाबद्दल राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

राज्यपालांनी महापुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये. तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यानी सांभाळून महापुरुषाबद्दल बोलले पाहिजे. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला समर्थनच दिलेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT