Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime: आदल्या दिवशी पदकाने सन्मान, दुसऱ्या दिवशी गुन्हा; विनयभंग प्रकरणी पोलिस निरीक्षकाविरोधात कारवाई

Sambhajinagar Police: संभाजीनगरमध्ये पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसाने त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याची तक्रार केली होती.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी आदल्या दिवशी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशीच पोलिस निरीक्षकाविरोधात कारवाई करत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या महिला शिपायाने या पोलिस निरीक्षकावर आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्कृष्ट सेवेसाठी सोमवारी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार मिळताच दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला शिपायाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणी भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक भंडारे यांनी हे मेसेज ९ एप्रिल रोजी रात्री पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र हा गुन्हा द्वेषभावना आणि गैरसमजातून झाला, असे भंडारे यांचे म्हणणे आहे. पोलिस मुख्यालयात ३४ वर्षांच्या फिर्यादी शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका नंबरवरून कॉल आला. परंतु, त्या आईसोबत बोलत असल्याने त्यांनी कॉल घेतला नाही.

नंबर सेव्ह नसल्याने त्यांनी 'कौन?' असा मेसेज पाठवला. त्यावर अधिकाऱ्याने स्वतःचा फोटो पाठवला आणि लगेच डिलीट केला. त्यावर त्यांनी पुन्हा 'कौन?' अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवला. महिला पोलिसाला अशोक भंडारे यांनीच मला हे आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याचे लक्षात येता त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT