धक्कादायक! औरंगाबादेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मारेकऱ्यांनी गुप्तांगही जाळले  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! औरंगाबादेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मारेकऱ्यांनी गुप्तांगही जाळले

औरंगाबादमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Aurangabad) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागामध्ये असलेल्या मैदानात (Ground) ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी (accused) तरुणाची हत्या (killing) केल्यावर त्याचे गुप्तांग जाळल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

औरंगाबादमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी यावेळी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन हा वाद झाल्यावर ही हत्या केली असावी असा देखील अंदाज पोलिसांनी यावेळी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack Symptoms: गर्दीत घाबरल्यासारखं वाटतंय? असू शकतो पॅनिक अटॅकचा धोका, वेळीच ओळखा लक्षणं

Maharashtra Live News Update : कृषिमंत्र्यांकडून 'त्या' बातमीची दखल, 7 ऑक्टोबरला बोलावली बैठक

Team India: टीम इंडिया प्रॅक्टिस करत असतानाच मैदानात घुसला साप; खेळाडू झाले सुन्न

शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची संशय कुणाकडे?

OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध, वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT