Summer  Saam Tv
महाराष्ट्र

Summer: औरंगाबादचा पारा आठवडाभरात 43 अंशांपर्यंत जाणार - हवामान विभाग

29, 30 आणि 31 मार्चला औरंगाबाद शहरात उष्णतेची लाट राहणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: आज कडक उन्हाने औरंगाबादकरांची लाही लाही झाल्याचं चित्र दिसून आलं. आज औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीला पोहोचला आहे. या आठवड्यात औरंगाबाद शहराचा पारा 43 अंशांपर्यंत जाणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे (Aurangabad temperature will rise to 43 degrees in a week says by Meteorological Department).

त्यानुसार, 29, 30 आणि 31 मार्चला औरंगाबाद (Aurangabad) शहरात उष्णतेची लाट राहणार आहे. आठवड्यांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे औरंगाबाद शहरात काहीसा उन्हाचा पारा कमी झाला होता. मात्र, रविवारपासून शहरात पुन्हा उन्हाची (Summer) तीव्रता वाढलीये. हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार, येत्या 29, 30 आणि 31 मार्च या तिन्ही दिवशी शहरात कमाल तापमान तब्बल 43 अंश सेल्सियसवर जाणार आहे.

यंदाच्या मोसमात उष्णतेच्या (Temperature) लाटेचा इशारा हा पहिल्याच वेळेस आला असून मार्चमध्येच (March) उन्हाचे चटके तीव्र झाले. एप्रिल आणि मे महिन्यात शहराचे तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहरामध्ये कमाल तापमानाने पस्तीशी गाठली होती. याच महिन्यात औरंगाबाद शहराचे कमाल तापमानही 40 अंशांच्या पार गेले होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT