जयश्री रितेश पाटील
जयश्री रितेश पाटील माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद: लग्नाच्या वर्षभरातचं गर्भवतीची आत्महत्या; रुग्णालयात नातेवाईकांची हाणामारी

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद:  वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या दोन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) जवळील वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज समोर आली. घटनेनंतर घाटी रुग्णालयात नातेवाईकामध्ये एवढी तुंबळ हाणामारी झाली की, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्री रितेश पाटील (वय-२४, रा.बाजाजनगर, औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे. (Aurangabad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जयश्रीने राहत्याघारी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जायश्रीला फसवरून खाली उतरवत तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

हे देखील पाहा-

घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. जयश्री मृत झाल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन गृह गाठले. यावेळी रोषामुळे नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. वाद वाढू नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्रीच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात (MIDC Waluj Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहीण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

Navi Mumbai News : अतिरिक्त फी न भरल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले; संतप्त पालकांनी गाठले पोलीस ठाणे

Marriage Invitation Card: लग्न पत्रिका बनवताना घ्या ही विशेष काळजी, अन्यथा...

SCROLL FOR NEXT