औरंगाबादमध्ये अवैध धंदे सुरुच! पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने गुन्हेगार मोकाट Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये अवैध धंदे सुरुच! पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने गुन्हेगार मोकाट

कारण गुन्हेगारांनी आता जीव घेण्यापर्यंत मजल गाठली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यानं गुन्हेगार मोकाट सुटलेत. यात सर्वसामान्यांसोबत काही प्रामाणिक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारण गुन्हेगारांनी आता जीव घेण्यापर्यंत मजल गाठली आहे.

औरंगाबाद एमआयडीसीमध्ये भोगले ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये गुंडानी कंपनीचे मालक नित्यानंद भोगले यांनाच बेदम मारहाण केली. त्यानंतर गणेश कोटिंग कंपनीच्या मॅनेजरला गुंडाकडून बेदम मारहाण झाली. या घटना ताजी असतानाच जिल्हा प्रशासनातील सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रक खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये घडलाय. नदीतून चोरून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल १२ किलोमीटर पाठलाग करून उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी दीपक त्रिभुवन आणि माणिक आहेर या दोघांनी ट्रक पकडला. मात्र, यादरम्यान ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही थरारक दृष्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली.

जिल्ह्यात नदीतील वाळू चोरणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध इतके मोठे झालेत की कोणत्याही सरकारी यंत्रणेला जुमानयाला तयार नाहीत. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू चोरीलाही लगाम लावता येत नाही. मात्र, न घाबरता दोघा कर्मचाऱ्यांनी मोटार सायकलवरून ट्रकचा पाठलाग केला. पळ काढणाऱ्या ट्रकला पुढे रस्ता नसल्याने तो थांबला. त्यानंतर हा ट्रक ताब्यात घेऊन त्यावर २ लाख ७२ हजारांचा दंड लावल्यात आले.

जिल्ह्यात किती वाळू परवाने आहेत, किती ट्रक चालवण्याची मुभा आहे, याची माहिती जिल्हा पोलीस आणि शहर पोलिसांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली गेली नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जातंय. अशात कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या प्रामाणिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव जाण्याची वेळ येते. त्यामुळे अशा मोकाट गुन्हेगारांच्या नांग्या ठेचल्या नाही तर धोक्याचं असेल. हा विचार किमान जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने करावं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

SCROLL FOR NEXT