aurangabad
aurangabad saam tv
महाराष्ट्र

Crime News : चक्क सुपारी घेऊन चाेरायचे दुचाकी; दाेघे अटकेत

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

औरंगाबाद : औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यातील पैठण पोलिसांनी सुपारी घेऊन दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टाेळीकडून सहा दुचाकी (two wheelers) जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक (arrest) केली आहे. (aurangabad latest marathi news)

कृष्णा औचरमल आणि मिलिंद नागराळे अशी पाेलिसांनी अटक केलेल्या संशयित चाेरट्यांची नावे आहेत मोटारसायकल चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती किशोर पवार (पोलीस निरीक्षक, पैठण) यांनी दिली.

पोलीस निरीक्षक किशोर पवार म्हणाले पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. आम्ही दुचाकी चोरीची सुपारी घेत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दुचाकी चोरून टोळीप्रमुखाला नेऊन द्यायची, त्यांनतर ठरलेली रक्कम घेऊन यायची असा हा सर्व चोरीचा खेळ सुरु असल्याचं तपासात समोर आले आहे.

सगळ्या गाड्यांचे दर ठरवून घायचे, त्यानुसार गाडी चोरून आणून द्यायची आणि आपले पैसे घेऊन मोकळे व्हायचे. त्यामुळे बाकी सर्व भानगडीत न पडता सुपारी घेऊन दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा पाहून पोलीस सुद्धा चक्रावले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संशयित आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mother's Day: कामानिमित्त घरापासून लांब आहात? मग 'मदर्स डे'ला अशा पद्धतीने आईला खुश करा

Travelling Tips: विमानातून प्रवास करताना परफ्यूम आणि डिओड्रंट न्यायला बंदी, पण का?

Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

SCROLL FOR NEXT