दंड भरतो, पण मास्क नाही लावणार! Saam Tv
महाराष्ट्र

दंड भरतो, पण मास्क नाही लावणार!

दंड भरतो, पण मास्क लावणार नाही, अशी बेफिकरी औरंगाबाद शहरातील नागरिकांकडून सध्या दिसत आहे. मास्क लावत नसलेल्या नागरिकांकडून आतापर्यंत दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

माधव सावरगावे

माधव सावरगावे
औरंगाबाद : दंड भरतो, पण मास्क लावणार नाही, अशी बेफिकरी औरंगाबाद Aurangabad शहरातील नागरिकांकडून सध्या दिसत आहे. मास्क लावत नसलेल्या नागरिकांकडून आतापर्यंत दोन कोटींचा दंड Fine वसूल करण्यात आला आहे. आता तर दंड वसूल करणारे पथकच थकले आहे. मात्र, औरंगाबादकर काही सुधारत नाहीत.

कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे सरकारने निर्बंध लावले आहेत. ते निर्बंध शिथिल करावं अशी मागणी होत असताना लोकांची बेफिकिरी आता मोठ्या संकटाकडे नेईल, अस औरंगाबादमध्ये दिसत आहे. कारण लोक दंड भरायला तयार आहेत, पण मास्क लावायला नाही. आतापर्यंत मास्क वापरत नसलेल्या नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडही आकारण्यात आला. त्यातून शहरात तब्बल १ कोटी ८६ लाख ४ हजार रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.

तिसऱ्या लाटेचा Third Wave धोका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र आजही अनेकजण मास्क नाकाखाली, हनुवटीवरच ठेवत आहेत, हे विशेष. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युचे प्रमाण मोठे होते. डबल म्युटंट स्टेनमुळे रुग्ण अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये दगावत होता. आपल्या डोळ्यासमोर सर्व काही घडत होते, तरीही नागरिक त्यापासून धडा घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने नाईलाजास्तव कारवाईचा बडगा उगारला. बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर नगर पालिकेच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता तेही थकलेत.

आत्तापर्यंत औरंगाबाद शहरातील नागरिकांनी निव्वळ दंडापोटी १ कोटी ८६ लाख ४ हजार रुपये भरलेत, अजूनही भरायला तयार आहेत. मास्क लावले नाही म्हणून दंड वसूल करणारे औरंगाबाद महापालिकेचे पथकं आता थकले आहेत. कारण दंड भरू पण मास्क नको असं औरंगाबादकर म्हणत आहेत. किमान आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन तरी औरंगाबाद कर आणि विचार करायला हवा नाहीतर संकट ओढवायला वेळ लागणार नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहातून बाहेर

Gold Price: आठवडाभरात सोनं ८००० रुपयांनी वाढले, २०२४ मध्ये दसऱ्याला सोन्याची दर किती होते?

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

SCROLL FOR NEXT