Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: सासूकडून सूनेला संक्रांतीचे अनोखे वाण; सासूचा निर्णय सुनेला देऊन गेला नवं आयुष्‍य

सासूकडून सूनेला संक्रांतीचे अनोखे वाण; सासूचा निर्णय सुनेला देवून गेलं नवं आयुष्‍य

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : सासू- सुनेच्या नात्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या नात्याबद्दल अनेकदा आपण नकारात्मक बाबी ऐकतो. मात्र सर्वच सासू तशा नसतात. कारण (Aurangabad) औरंगाबादमध्ये सासू- सुनेच्या नात्याची कौतुकास्पद घटना समोर आली. (Breaking Marathi News)

काही सासू– सुनेवर मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करते. हे औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील जैस्वाल कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे. या सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र त्याच रक्त गटाची किडनी मिळणे सोपे नव्हते.

अखेर सासूने घेतला निर्णय

नातेवाइक तसेच इतरांची किडनी त्यांना जुळत नव्हती. यामुळे जैस्वाल कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले. याबाबत कुटुंबात चर्चा होत असतांनाच क्षणाचाही विचार न करता ६४ वर्ष वयाच्या योगिता यांच्या सासू रत्नाबाई रमेश जैस्वाल यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर दोघींच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांची किडनी सुनेसाठी जुळेल असे स्पष्ट झाले. त्यानंतर १४ जानेवारीला संक्रांतीच्या पूर्व संध्येला शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. कोईमतूर (तमिळनाडू) येथील कोवाई रुग्णालय येथे तब्बल नऊ तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचार सभा

Migraine Or Headache: डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! मायग्रेन आणि साध्या डोकेदुखीमधील फरक जाणून घ्या

Orange Juice Benefits For Heart : दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते का? जाणून घ्या

Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

Dalgona Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी झटपट बनवा कॅफेसारखी फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी

SCROLL FOR NEXT