Aurangabad Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: 20 मिनिटांत 25 दुचाकींना अपघात; घटनांमागील कारणे आली समोर

वीस मिनिटात 25 दुचाकींचे अपघात

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद- पैठण रोडवरील ढोरकीनजवळ एकामागून-एक दुचाकी अपघात झाले. एक, दोन, तीन नव्‍हे तर 20 मिनिटांत 25 अपघात (Accident) घडल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार आज सकाळी झाला. (Aurangabad Accident News)

औरंगाबाद- पैठण रोडवरील ढोरकीनजवळ समांतर जलवाहिनीचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यावर माती आणि चिखल झाला आहे. यात रात्री झालेल्या पावसामुळे (Rain) रस्त्यावर चिखलच चिखल झालेला आहे. त्यामुळे आज सकाळी एकामागून- एक द्दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले. ढोरकीन गावातील कुलस्वामिनी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अक्षय हॉटेलजवळ हा प्रकार घडला.

नागरीकांनी केला रास्‍ता रोको

रस्‍त्‍यावरील चिखलामुळे होत असलेल्‍या अपघातामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. काही नागरिकांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून, संताप व्यक्त करत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा संताप पाहत कंत्राटदाराने रस्त्यावरील चिखल जेसीबीच्या साह्याने दुर केले. त्यानंतर अखेर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मगरीच्या हल्ल्याचा थरार, आईसाठी मुलगी थेट मगरीशी भिडली

भारतात 2027 मध्ये कमी पाऊस, 100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती

I Phone चे हप्ते थकले, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

हॉस्टेलवाले प्रेगन्सी टेस्ट करायला लावतात; आदिवासी मुलीने सांगितली हॉस्टेलमधील धक्कादायक बाब

नोकरीचं स्वप्न दाखवलं, लॉजमध्ये डांबलं! शिरूरमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT