Aurangabad: शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवले; मध्यरात्री राडा...(पहा Video)  माधव सावरगावे
महाराष्ट्र

Aurangabad: शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवले; मध्यरात्री राडा...(पहा Video)

काल रात्री शहरामधील काही शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: काल रात्री शहरामधील काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरामधील क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर (banner) काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झालेली होती. परंतु पोलिसांना (police) या प्रकरणाविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना तिथून पांगवन्यात आले आहे. घटनास्थळी रात्री अनेक पोलिस उपस्थित होते. (aurangabad Municipal Corporation removed banner Shivpremi)

पहा व्हिडिओ-

तसेच रात्री बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सध्या औरंगाबादच्या महापालिकेत (Municipal Corporation) शिवसेनेची (shivsena) सत्ता आहे. यामुळे त्यांनी मुद्दाम खोडसाळपणा केला असल्याचा आरोप बॅनर कार्यकर्त्यांचा आहे. पोलिसांनी वेळेतच मध्यस्थी केल्यामुळे वातावरण निवळल्याचे दिसून आले आहे. शिवजयंती तोंडावर आल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवजयंती बॅनर लावण्यात येत आहेत. पण महापालिकेने कारवाई केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले आहे. सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने शहारात किंवा खेड्यात अनेक ठिकाणी बॅनर लावल्याचे दिसून येत आहे. परंतु, त्याची परवानगी घेऊन अनेक ठिकाणी बॅनर लावले जात आहेत.

हे देखील पहा-

काल झालेल्या प्रकरणात नेमके काय झाले आहे? हे अद्याप समजू शकले नाही. कारण औरंगाबादची महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिथे शिवसैनिकांची सत्ता असल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. तसेच शिवजयंतीच्या तोंडावर बॅनर लावून शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येकवेळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ उपक्रम देखील राबिवले जात असतात. पण काल घडलेल्या घटनेमुळे औरंगाबादमधल्या क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे बघायला मिळत आहे. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांची देखील बाचाबाची झाली असल्याचे समजत आहे. नेमका बॅनर का हटवला किंवा का कारवाई केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

रात्री झालेल्या राड्यामध्ये अनेकांनी पोलिसांना उर्मट भाषा केली आहे. तर अनेकांनी पोलिसांना जाब विचारला आहे. यामुळे तिथली परिस्थिती अधिक प्रमाणात चिघळली होती. शिवप्रेमीचे क्रांती चौकातले अनेक बॅनर हटवल्याने कार्यकर्ते एकत्रित आले होते. महापालिने रात्रीच का बॅनर काढले असे देखील शिवप्रेमींनी पोलिसांना विचारले आहे? बॅनर काढल्याची माहिती अनेकांना समजताच शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते. शिवसेनेकडून आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

SCROLL FOR NEXT