औरंगाबाद महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग जास्त! सापडल्या दारूच्या बाटल्या डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग जास्त! सापडल्या दारूच्या बाटल्या

महापालिकेत काम करण्यासासाठी येतात की ओल्या पार्ट्या करण्यासाठी?

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - कालच मंत्रालयात दारुच्या Liquor रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला. हा प्रकार ताजा असतानाच आता औरंगाबाद Aurangabad महानगरपालिकेतही दारुच्या रिकाम्या बाटल्या Bottles आढळल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत Corporation काम कमी आणि भलताच उद्योग जास्त असे चित्र दिसून येत आहे. महापालिकेत नेते-मंडळी, अधिकारी वर्ग काम करण्यासासाठी येतात की ओल्या पार्ट्या करण्यासाठी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी आणि विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या ओल्या पार्टीत कोण कोण सहभागी असतं? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहे.

हे देखील पहा -

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच ओली पार्टी होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  कारण महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागातच देशी आणि विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग सुरु असल्याने संतप्त प्रतिक्रिया औरंगाबादकर व्यक्त करत आहेत.

दरम्यान याआधी मंत्रालयातील त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, संपुर्ण मंत्रालयात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना या दारुच्या बाटल्या आल्या कुठुन, त्या कोणी आणल्या, आणि कोणासाठी आणल्या, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मंत्रालायात संपुर्ण राज्याचा कारभार चालवला जातो. मंत्रालय राज्याच मुख्यालय आहे. याठिकाणा लोक त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी मांडण्यासाठी येत असतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT