Arrest , Aurangabad, LCB , Police, youth Saam Tv
महाराष्ट्र

LCB : एलसीबीची माेठी कामगिरी; खंबाळ्यातील खून प्रकरणी कलबुर्गीतून एकास अटक

रुपेशच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले होते.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या गुन्हेगारास एलसीबीनं (LCB) कर्नाटकातील कलबुर्गी शहरात बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. रुपेश ऊर्फ डोंगऱ्या चव्हाण असं गुन्हेगाराचे नाव आहे.

शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबावर हल्ला करीत त्यातील एकाचा खून केल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुन्हेगार रुपेश ऊर्फ डोंगऱ्या शिवराम चव्हाण (रा. कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. नगर) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) कर्नाटकातील कलबुर्गी शहरात बेड्या ठोकल्या आहेत. रुपेश ऊर्फ डोंगऱ्या याने साथीदारांच्या मदतीने वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील शेतवस्तीवर दरोडा टाकत एका मुलाचा खून केला होता.

यात महिलांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना २ जुलै २०२१ रोजी घडली होती. ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्यातील सहभागी इतर दोन संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र, सूत्रधार रुपेश फरार होता. त्याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले होते.

या पथकाने अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद शहर व जिल्ह्यात त्याचा शोध घेतला. मात्र, तो प्रत्येक वेळी ओळख लपवून पळून जाण्यात यशस्वी ठरला. एलसीबीच्या पथकास रुपेश हा कर्नाटकातील कलबुर्गी शहरात मजुरीसह चोऱ्या करून राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी कलबुर्गी शहरातून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास औरंगाबाद येथे आणल्यानंतर वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT