''जायकवाडीच्या कामासाठी खूप रक्कम लागली तर जागतिक बँकेची मदत घेऊ'' Saam TV
महाराष्ट्र

''जायकवाडीच्या कामासाठी खूप रक्कम लागली तर जागतिक बँकेची मदत घेऊ''

धरणाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले जायकवाडी धरणातीसल गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, गाळामुळे धरणाची क्षमता कमी झाली आहे, याबाबत अभ्यास सुरु आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: जलसंपदा मंत्री जयंत पाटील औरंबादच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तिथे जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची पाहणी केलाी आणि त्याची दुरुस्ती करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना ते म्हणाले दुरुस्तीच्या कामचं सर्वेक्षण सुरू केलं आहे, खूप रक्कम लागली तर जागतिक बँकेची मदत घेऊन हे काम केलं जाईल, त्याने जिल्ह्याला मदत होईल असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.

धरणाबद्दल अधिकचे बोलताना..

धरणाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले जायकवाडी धरणातीसल गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, गाळामुळे धरणाची क्षमता कमी झाली आहे, याबाबत अभ्यास सुरु आहे. अंदाजे 20 ते 30 टक्के गाळ असण्याची शक्यता आहे. Covid मूळे सगळ्याच विभागांना कात्री लागेल मात्र काम पुर्ण होईल. मराठवाड्यात अधिकचे पाणी आणाण्यचा निर्धार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक आणि नगर वळण बंधाऱ्यातून सुद्धा पाणी आणणार आहे. 28 तारखेला होणाऱ्या शेतकऱ्यांचा संपाला राष्ट्रवादी काँग्रेस चा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

मंत्रीमंडळ प्रभागपद्धती मंत्रीमंडळाचा निर्णय

मंत्रीमंडळाच्या प्रभाग पद्धतीच्या निर्णयाबद्द बोलताना ते म्हणाले, प्रभाग पद्धती बाबत मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे आता त्यावर वेगळं बोलणं योग्य नाही. किरीट सोमय्यांबद्दल बोलताना ते म्हणाले ते पुन्हा जात असतील तर ठिका आहे, त्यांना अडवणार नाही आम्ही आता त्यांना सुरक्षा दिली आहे.

दोन नेते एकत्र भेटले तर आमचं ऑब्जेकॅशन नाही.

आज गृहमंत्री अमित शहांनी १० राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी बैठक ठेवली आहे. त्या बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले मुख्यमंत्री नक्षल भागातील प्रश्नांबाबत चर्चा करायला गेले आहेत. प्रश्न नक्षल बाबत आहे आणि तिच बैठक आहे याबाबत राज्यपुरता विचार केला आहे. आता दोन्ही नेते एकत्र भेटले तर आमचं ऑब्जेकॅशन असण्याचा काहीच प्रश्न नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT