plastic house news saam tv
महाराष्ट्र

प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार केले पर्यावरणपूरक 'प्लास्टिक वावर'; औरंगाबादमधील तरुणींची कमाल

टाकाऊ प्लास्टिक (Plastic) आणि बिसलरी बॉटलचा वापर करून एक आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार केले आहे. कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे अशी या मैत्रिणींची नावे आहेत. सध्या हे प्लास्टिक वावर लोकांचे आकर्षण ठरत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील फाईन आर्ट्सचे शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींनी टाकाऊ प्लास्टिक (Plastic) आणि बिसलेरी बॉटलचा वापर करून एक आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार केले आहे. कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे अशी या मैत्रिणींची नावे आहेत. सध्या हे प्लास्टिक वावर लोकांचे आकर्षण ठरत आहे. त्यांच्या प्लास्टिक वावराची संपूर्ण औरंगबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ( Aurangabad News In Marathi )

मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात गुवाहाटी हा चर्चेचा विषय ठरत आहे. याच गुवाहाटीतील एका शाळेचा यु-ट्यूबवर व्हिडीओ बघून औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फाईन आर्ट्सचे शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींनी टाकाऊ प्लास्टिक आणि बिसलेरी बॉटलचा वापर करत एक आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार केले आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून हे काम त्यांनी सुरू केले आणि आता ते पूर्णत्वास गेले आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेले टाकाऊ प्लास्टिक आणि कचराकुंडीवर पडलेल्या बिसलरी बॉटल या तरुणींनी जमा करून या बॉटल्समध्ये टाकाऊ प्लास्टिक भरुन त्यांनी त्या एकावर एक विटा सारख्या ठेवून त्याच्या भिंती तयार करून अनोखे घर बनवले आहे. यासाठी त्यांनी तब्बल 16 हजाराहून अधिक बिसलरी बॉटल्सचा उपयोग केला.

तसेच यासाठी त्यांना सुमारे सहा ते सात लाख रुपये खर्च देखील आला. हे सर्व त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये याची सुरुवात केली होती‌. यावेळी त्यांना घरच्यांकडून सुरुवातीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र त्यांनी आपल्या घरच्यांना या सर्व गोष्टी पटवून दिल्यानंतर त्यांच्या परिवाराने देखील त्यांना सहकार्य केले आणि सर्वांच्या मदतीने त्यांनी अनोखे प्लास्टिक वावर तयार केले आहे, असे प्लास्टिक वावर तयार करणाऱ्या या विद्यार्थिनींने सांगितले.

दरम्यान, हे आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार झाल्यानंतर दोन्ही मैत्रिणींनी आपले प्लास्टिकचे गाव बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. औरंगाबाद शहरापासून जवळच असलेले हे प्लास्टिकचे वावर या परिसरात येजा करणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. यामुळे कचराकुंडीतील टाकाऊ वस्तू पासूनही आपण अशा अनेक आकर्षित आणि अनोख्या वस्तू बनवू शकतो हे त्यांनी यातून दाखवून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT