Aurangabad । शहरात दुर्लभ कश्यप सारख्या गुंडागिरी करणारी गॅंग चर्चेत माधव सावरगावे
महाराष्ट्र

Aurangabad । शहरात दुर्लभ कश्यप सारख्या गुंडागिरी करणारी गॅंग चर्चेत

मध्य प्रदेशातील दुर्लभ कश्यप गुंडाचे अनुकरण करून औरंगाबादमध्ये काही तरुणानी दहशत निर्माण केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दुर्लभ कश्यप गुंडाचे अनुकरण करून औरंगाबादमध्ये (Aurangabad) काही तरुणानी दहशत निर्माण केली आहे. सोशल मीडियातील (Social media) व्हिडिओ (Video) पाहून तसेच अनुकरण केल्यामुळे औरंगाबाद शहरात गुन्हेगारी आता वाढू लागली आहे. मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र उज्जैन या ठिकाणी दुर्लभ कश्यप नावाचा मुलाचा जन्म झाला होता. परंतु, हा तरुण अल्पवयीन (Minor) असतानाच वयाच्या १७ व्या वर्षीच गुन्हेगारीचा जगताचा बादशहा बनला होता. (aurangabad durlabh kashyap gang terror crime rate has risen who is the rare kashyap)

हे देखील पहा-

कुणाला मारायचं असेल, कुणाला ठोकायच असेल, तर संपर्क करा अशा प्रकारच्या सोशल मीडियावर जाहिराती करून सुपाऱ्या घेणारा दुर्लभ कश्यप गुन्हेगारी क्षेत्रात व्हायरल (Viral) झाला होता. परंतु, वयाच्या विसावी मध्येच जास्तीत- जास्त शत्रू निर्माण केल्याने त्याचा देखील शेवट हा तडफडूनच झाला आणि गॅंगवारमध्ये मारला गेला आहे. मात्र, कपाळावर आडवा गंध गळ्यात काळे उपरणे आणि गुंडगिरी माजवणाऱ्या या दुर्लभ कश्यप सारखे औरंगाबादेत तरुण बनले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर त्यांनी असाच हल्ला केला आहे.

हळदीच्या कार्यक्रमांमध्ये हे तरुण तलवार, चाकू आणि जांबिया सारखे शस्त्र घेऊन २६ जानेवारी दिवशी डान्स करत होते. यामुळे यांच्यात ५ तरुणांना एक दिवसाची कोठडी झाली होती. कोठडीतून बाहेर पडतातच अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणावर या टोळक्याने गंभीर स्वरूपाचे तलवारीचे वार करून ७० टाके पडले आहेत, असा हल्ला त्यांनी केला आहे. यांची दहशत एवढी आहे की यांच्याविरोधात बोलायची कुणाची हिंमत होत नाही. सिनेमामध्ये ज्याप्रकारे गुंड कृत्य करतात. त्यापेक्षाही भयानक कृत्य हे १८, २० आणि २२ वर्षाचे मुले करत आहेत.

औरंगाबाद मधील बहुतांशी ठिकाणी ही मुले आपली दहशत माजवत आहेत. औरंगाबादमध्ये अश्या गॅंगमुळे मोठी गुन्हेगारी वाढत असून पोलिस (Police) प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काय पावले उचलतात आणि गुन्हेगारीला कसा आळा घालतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा कुणाचे नाहक बळी जायला नको.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT