Sambhajinagar News Saam Tv News
महाराष्ट्र

Drug Racket: 'माझा नवरा डॉन' गुजरातमधलं ड्रग्ज संभाजीनगरात, पोलिसांनी नवरा बायकोला ठोकल्या बेड्या

Gujarat drug supply Network: गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Bhagyashree Kamble

गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. यात सराईत गुंड असलेला अजय वाहूळ ऊर्फ ठाकूर आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर ड्रग्जची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा १ लाखांपर्यंतचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगरात एका जोडप्याच्या घरात अंमली पदार्थ आढळून आला आहे. या प्रकरणात अजय वाहूळ आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरातल्या साईनगरमध्ये त्यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यांच्या घरामध्ये अंमली पदार्थ आढळून आले.

छापा टाकल्यानंतर घरात एमडी ड्रग्जची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा १ लाख ५ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुजरातच्या सुरतहून आयेशा नावाच्या महिलेकडून अंमली पदार्थ आणून विक्री करीत असल्याची कबुली आरोपी ठाकूर याने पोलिसांना दिली आहे.

विशेष म्हणजे अजय ठाकूर हा कुख्यात गुंड आहे. तो सहा वर्षांपासून जेलमध्ये होता. त्यावेळी त्याची पत्नी राणी ठाकूर ही अंमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळत होती. 'माझा नवरा डॉन आहे' असे धमकावत ती दादागिरी करून नशेचे अंमली पदार्थ विकत होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar: राजकीय घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार?

Director Arrested: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाला अटक, अभिनेत्रीनेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Fact Check : गटारीतील पाण्याची पाणीपुरी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

US-Israel-Iran War : अमेरिका माघार घेणार, युद्धविराम होणार? ट्रम्प गुरुवारी संबोधित करणार

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT