file photo saamtv
महाराष्ट्र

औरंगाबाद : वाळूज MIDC परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट!

स्फोटाची तीव्रता एवढी होती की, वेल्डरच्या शरीराचे अवयव अर्धा किलोमिटर दूरवर जाऊन पडले!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या बाहेर आज दुपारच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. अचानक झालेल्या स्फोटमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

प्राथमिक माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीच्या गट नंबर एम-१२१ मधील प्रभाकर इंजिनीअरिंग कंपनी समोर दुचाकीला वेल्डींग करताना सिलेंडरचा भीषण असा स्फोट झाला आहे. यामध्ये वेल्डर आणि आणखी दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली आहे. तर आजूबाजूचे सहा ते सात लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

वाळूज भागात अनेक ठिकाणी दुचाकीला वेल्डींग करणारे वेल्डर आपली छोटीशी दुकान लावून बसतात. त्याचप्रमाणे प्रभाकर इंजिनीअरिंग कंपनीसमोर सुद्धा घटनेत जखमी झालेला वेल्डर नेहमी आपली दुकान लावून बसतो. दरम्यान, एका गाडीला वेल्डींग करत असताना हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, वेल्डरच्या शरीराचे अवयव अर्धा किलोमिटर दुरपर्यंत उडाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT