Auranagabad Sillod Husband Wife Death Saam TV
महाराष्ट्र

Auranagabad News : पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; काळीज पिळवटून टाकणारी घटना

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घटांब्री येथील एका नवविवाहित जोडप्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टिव्ही

Auranagabad News : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घटांब्री येथील एका नवविवाहित जोडप्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे. विकास तायडे आणि सपना तायडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. (Latest Marathi News )

प्राप्त माहितीनुसार, विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. रविवारी विकास हा काही कामानिमित्त सिल्लोड (Aurangabad) शहरात गेला. त्याचवेळी पत्नी सपना हिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पत्नी सपनाने आत्महत्या केल्याची बातमी कळताच विकासला जबर धक्का बसला. या धक्क्यातून विकासला सावरणं अशक्य झालं आणि त्याने सुद्धा रस्त्याने येत्या वेळेस अंभईजवळील बोरगाव येथील खेळणा नदीच्या पुलावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, विकास आणि सपना यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पत्नी आणि पतीने एकाच दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT