Court  Saam Tv
महाराष्ट्र

Court: सरकारी वकीलांची मागणी अमान्य; इतके दिवस पाेलिसांनी काय चाैकशी केली : न्यायालय

डीएमआयसी समृद्धीसह धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी बिडकीन, चिकलठाणा, करमाडसह कन्नड भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मावेजा दिला आहे. अशाच भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना गाठून मास्टरमाइंड सचिन ऊर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या टोळक्याने २५ ते ३० टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो कोटी रुपये उकळले. त्यातून गुन्हा नाेंद झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : मराठवाड्यासह मराठवाड्यात गाजत असलेल्या ३०-३० घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोड (santosh rathod) याला न्यायालयाने आज (साेमवार) न्यायालयीन कोठडी (magistrate custody) सुनावली आहे. संतोष राठोड याची आज पोलीस कोठडी (police custody) संपत होती.

या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी संताेष राठाेडला पुन्हा पाेलिस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायाधिशांना केली. यावर न्यायालयाने (court) पोलीस (police) तपासावरच ताशेरे ओढत दहा दिवसांमध्ये काय चौकशी केली याची विचारणा केली. त्यावेळेस पोलीस कोठडी वाढवून याबाबत पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.

विशेष म्हणजे संतोष राठोड यांच्या वकिलाला न्यायालयामध्ये एकही शब्द बोलण्याचे काम पडले नाही. त्यानंतर न्यायाधीश ए कुलकर्णी यांनी संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी देत हर्सूल कारागृहात (harsul jail) रवानगी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारी

Kareena Kapoor: हटके स्टाईलमध्ये करिनाची एअरपोर्टवर एन्ट्री, सेल्फी काढायचा दिला नकार; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,Video व्हायरल

Beed Politics: महायुतीमधील कलह चव्हाट्यावर, भाजप नेत्याचा थेट अजित पवारांना टोला

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

Bigg Boss 18: विवियनने रजतला खाली आपटलं; बिग बॉसच्या घरात नवीन राडा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT