अविनाश कानडजे
औरंगाबाद: कोरोनाने वर्षभरापासून शाळा, महाविद्यालयं बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा लिहिण्याचा सराव राहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये शासन विद्यार्थ्यांचा (students) विचार न करता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत आहे. यामुळे या परीक्षा (Exam) रद्द करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. (Aurangabad Cancel 10th 12th exams Student aggressive)
हे देखील पहा-
निवेदनात सांगितले आहे की, गेल्या २ वर्षांपासून शाळा (School), कॉलेज पूर्णपणे बंद आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाइन चालू झाला आहे. तरी शासनाने मार्च-एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थी मानसिक खालावले आहे. अनेक विद्यार्थी हे टोकाचे पाऊल देखील उचलू राहिलेत. कारण अभ्यासाकरिता फक्त १ महिन्याचा वेळ असल्यामुळे अभ्यास होणे शक्य नाही. गेल्या २ वर्षांपासून अभ्यासाचा लिहिण्याचा सराव राहिला नाही, अशा परिस्थितीमध्ये शासन विद्यार्थ्यांचा विचार न करता परीक्षा घेत आहे. ही परीक्षा रद्द करण्यात यावी.
या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ६ दिवसांत मागणी मान्य न झाल्यास सर्व विद्यार्थी हे रस्त्यावर उतरणार आहेत, असा इशारा निवेदनाद्वारे विद्यार्थांनी यावेळी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.