पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट भारत नागणे
महाराष्ट्र

पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

800 किलो देशी‌ विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करुन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : श्रावणी पुत्रदा‌ एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाटील ‌यांच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

मंदिराचा गाभारा, प्रवेश द्वार, सोळखांबी, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजविण्यात आले असून अत्यंत आकर्षक सजावटीमुळे मंदिरातील वातावरण देखील फुलून गेल्याचे चित्र आहे.

झेंडू, आर्किड, कारनेशियन, शेवंती, कामिनी, एथोरीयम, गुलाब,‌ आष्टर,‌ जिप्सोफेलिया,‌ तुळस, गड्डी फुले आशा 800 किलो देशी‌ विदेशी फुलांचा आणि पानांचा वापर करुन मंदिर सजवले आहे. रंगबेरंगी‌ फुलांच्या सजावटी मुळे देवाचे‌‌ रुप‌ अधिकच खुलून दिसत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांकडूनच आंदोलक विद्यार्थ्यांवर दगडफेक; व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद, पाहा धक्कादायक दृश्य

Maharashtra News Live Update: नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट

CJP Protest : विद्यार्थिनींवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; जंतरमंतरवर आक्रोश अन्..., VIDEO पाहून राग अनावर येईल

Mumbai Court : मुंबई न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, ४४ समुद्री दरोडेखोरांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं?

Sawantwadi Hill Station : महाराष्ट्राचं 'चेरापुंजी' कधी पाहिलंय का? पावसाळ्यात स्वर्गापेक्षा कमी नाही

SCROLL FOR NEXT