Kidnapping
Kidnapping Saam Tv
महाराष्ट्र

खळबळजनक! तोंडात बोळा कोंबून 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न...

विनोद जिरे

बीड - गेवराई शहरातील एका धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शाळा (School) सुटल्यानंतर घरी चाललेल्या एका 11 वर्षीय मुलाचे, ओमिणीमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी, तोंडात बोळा घालून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांना संशय येताच, तात्काळ सतर्कता दाखवल्याने, मुलाला गाडीतून काढण्यात यश आलं मक्तर अज्ञात अपहरणकर्त्यांनी धूम ठोकली.

मिळालेल्या माहितीवरून गेवराई शहरातील बागवान अनस हाफिजोद्दीन वय 11 हा मुलगा द.बा. घुमरे विद्यालयात इयत्ता 6 च्या वर्गात शिकत आहे. काल शाळा सुटल्यानंतर, तो कोल्हार रोडवर असलेल्या आपल्या घराकडे जात होता. या दरम्यान तो नगर पालिकेच्या स्टेडियम जवळ आला असता, ओमिणीमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अनस याला तोंड दाबून गाडीत ओढले आणि त्याच्या तोंडात कपड्याचा बोळा घालून वाहन औरंगाबाद (Aurangabad) रस्त्याने घेऊन गेले.

हे देखील पहा -

दरम्यान शहराच्या बाहेर एका बियर बारवर दारु घेण्यासाठी गाडी थांबवली असता यावेळी गाडीतून उतरलेल्या इसमाच्या हालचालीवर संशय आल्याने, काही नागरिकांनी गाडीत डोकावून पाहिले. यावेळी आतमध्ये तोंड दाबलेला मुलगा दिसला. यादरम्यान अधिकच संशय बळावल्याने, नागरिकांनी चौकशी केली. मात्र त्यानंतर स्थानिक नागरिक व अपहरणकर्त्यांमध्ये झटापट झाली. आणि जास्त लोक जमू लागताच, अनस याला गाडीच्या बाहेर काढलं, मात्र अपहरण कर्त्यांनी वाहनासह धूम ठोकली.

दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र या घटनेने गेवराई शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांकडून अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

Health Tips: जेवल्यानंतर लगेचच आंघोळ का करू नये, कारण वाचा

Pune Car Accident: मुलगा बेदरकार, बाप जबाबदार! वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली; बापाला अटक, पबलाही टाळं

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: अय्यर ऑन फायर; हैदराबादचं वर्चस्व मोडून काढलं, कोलकाता फायनलमध्ये

SCROLL FOR NEXT