सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात इसमाकडून दगडफेक  SaamTv
महाराष्ट्र

सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात इसमाकडून दगडफेक

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील मद्दे वस्ती परिसरात हा प्रकार घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभुषण लिमये

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील मद्दे वस्ती परिसरात हा प्रकार घडला असून, सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. Attck on Gopichand Padalkar's vehicle in Solapur

आपल्या आक्रमक शैलीने ओळखले जाणारे पडळकर सदैव विविध विषयांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी गोपीचंद पडळकर सोडत नाहीत.

हे देखील पहा -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर प्रामुख्याने आपल्या वाग्बाणांनी पडळकर नेहमी हल्ला चढवत असतात. आज सकाळीच गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली होती. ''मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा,'' असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी पवारांची खिल्ली उडवली होती.

सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात इसमाकडून दगडफेक

त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय पटलावर सकाळपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियात देखील शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या वयाचा विचार करून टीका करावी अश्या प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान सोलापूर दौऱ्यावर असणारे पडळकर सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. मद्दे वस्ती यथील बैठक झाल्यानंतर पडळकर पुढच्या प्रवासास निघाले असताना अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT