'बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी मला धमकावले' Saam TV
महाराष्ट्र

'बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी मला धमकावले'

योगी आदित्यनाथ आणि RSS च्या चार नेत्यांची नावे घेण्यासाठी आपणाला धमकावले होतं शिवाय़ एटीएएसच्या अधिकाऱ्यांनी आपला खूप छळ केला असल्याचं साक्षीदाराने न्यायालयात सांगितलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS ) चार नेत्यांची नावे घेण्यासाठी धमकावले असल्याची साक्ष मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संबंधित खटल्यामधील एका साक्षीदाराने विशेष न्यायालयासमोर साक्ष दिली आहे.

दरम्यान न्यायालयाने या साक्षीदाराला फितूर म्हणून घोषित केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे या बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असताना राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त होते. तसंच भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवर दहशतवादाच्या मुख्य आरोपाअंतर्गत विशेष न्यायालयासमोर सध्या खटला चालवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी साक्ष नोंदवण्यात आलेल्या साक्षीदाराने ATS या प्रकरणाचा तपास करत असताना त्याचा जबाब नोंदवण्यात आल्याचे साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले. शिवाय परमबीर सिंग आणि च्या ATS च्या अन्य एका अधिकाऱ्याने योगी आदित्यनाथ, (Yogi Adityanath) इंद्रेश कुमार यांच्यासह RSS च्या चार नेत्यांची नावे घेण्यासाठी धमकावले होते असा दावा त्याने यावेळी केला शिवाय़ एटीएएसच्या अधिकाऱ्यांनी आपला खूप छळ केला असल्याचही या साक्षीदाराने सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

SCROLL FOR NEXT