NIA, ATS, Arrests, Nanded , PFI Organisation Saam Tv
महाराष्ट्र

PFI च्या कार्यकर्त्यास नांदेडमध्ये अटक; एटीएसची कारवाई

टेररं फंडींग प्रकरणात एनआयए आणि एटीएसची देशभरात छापेमारी सुरु आहे.

संतोष जोशी

Nanded News : नांदेड (Nanded) येथे दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) फरार संशयित आरोपी पाॅपूलर फ्रंट आॅफ इंडियाच्या मोहम्मद आबेद अली महेबूब अली या कार्यकर्त्याला देगलूर नाका भागातून अटक (arrest) केली आहे. यापुर्वी पीएफआयच्या चाैघांना अटक करण्यात आली हाेती.

पीएफआयच्या मोहम्मद आबेद अली महेबूब अली या कार्यकर्त्याला देगलूर नाका भागातून अटक करण्यापुर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) दिलेल्या सुचने नुसार एटीएसने नांदेडहुन मिराज अन्सारी या कार्यकर्त्याला तर परभणीतून चार जणांना अटक केली होती. हे पाचही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.

दरम्यान अटक केलेल्या मोहम्मद आबेद अलीला न्यायालयात हजर करण्यात आले. टेररं फंडींग प्रकरणात एनआयए आणि एटीएसनं (ats) देशभरात छापेमारी करण्यात आली. ही कारवाई पुढे सुरूच असल्याचे दिसते. एनआयएच्या कारवाई विरोधात पाॅपूलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने करत कारवाई चुकीची आहे अशी निवेदन दिली होती मात्र, तरीही एनआयएची कारवाई सुरूच आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT