Assembly Election SAAM TV
महाराष्ट्र

Assembly Election: मविआत शंभरी कोणाची? जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच

Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील दोन प्रमुख राजकीय आघाड्यांचं जागावाटपाचं सूत्र अद्यापही ठरलेलं नाही. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही प्रचंड रस्सीखेच आहे.अशातच मविआत कोण जास्त जागा लढणार आणि कोणाचा मुख्यमंत्री होणार यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे ते पाहूया.

Tanmay Tillu

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील दोन प्रमुख राजकीय आघाड्यांचं जागावाटपाचं सूत्र अद्यापही ठरलेलं नाही. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही प्रचंड रस्सीखेच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 100 पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नसल्याचं समजतं. तसं झाल्यास 30 वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला कमी जागांवर लढावं लागणार आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय.

निकालानंतर महायुती वा मविआ यापैकी एकाला बहुमत मिळाले तरी जागांच्या आकड्यांचा खेळ निर्णायक भूमिका बजावणार आहे. ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रिपद असा फार्म्युला समोर येऊ शकतो. आता जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर आधी जास्त जागा पदरी पाडून घेणं महत्त्वाचे आहे.

स्वबळावर कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट आहे, अशावेळी आपल्याशिवाय सरकार बनूच शकणार नाही, असा विचार समोर ठेवूनही रणनीती आखली जात आहे. मात्र युतीत असलेल्या शिवसेनेनं याआधी कधीही 100 पेक्षा कमी जागा लढवल्या नव्हत्या.

शिवसेनाच 'मोठा भाऊ'

2019 - 124 जागा - 56 आमदार विजयी

2014 - स्वबळावर 286 जागा - 63 आमदार विजयी

2009 - 160 जागा - 45 आमदार विजयी

2004 - 163 जागा - 62 आमदार विजयी

1999 - 161 जागा - 69 आमदार विजयी

1995 - 169 जागा - 73 आमदार विजयी

2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षाची दोन शकलं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, 2024 ची विधानसभेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. त्यामुळे जो जास्त जागा लढणार मुख्यमंत्रीपदावर त्याचा दावा साहजिकच असणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly : मविआत बिघाडीची शक्यता, ठाकरेंच्या चारही उमेदवारांचे काम करणार नाही, पवार समर्थक आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

Weather Update : पावसाची माघार, आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा; राज्यात आज कसं हसेल हवामान?

Horoscope Today : आज मनाप्रमाणे घटना घडतील, पैशांची आवक राहील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today: काहींना मिळेल कामात यश, काहींना होईल अचानक धनलाभ; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Burger E-COLI: एक बर्गर करेल तुमचा घात?बर्गरमधील E-COLI जीवाणूमुळे एकाचा बळी

SCROLL FOR NEXT