Ladki Bahin Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिण' ठरणार गेमचेंजर? मतांनी महायुतीची झोळी भरणार?

Maharashatra Assembly Election : महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना लाभकारी ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना लोकप्रिय ठरली असून त्याच परिणाम मतांवर होणार आहे.

Girish Nikam

सत्ताधारी महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला या योजनेनं तारलं होतं. महाराष्ट्रातही तसा फायदा होणार का? याची उत्सुकता आहे. राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय. पाहूया एक रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झालेल्या सत्ताधारी महायुती सरकारसाठी लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय. या योजनेवरुन महायुतीत श्रेयवादही दिसून आला. शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या योजनेवरुन कुरघोडी केल्या. योजनेवरुन राजकारण झालं असलं तरी मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही या योजनेमुळे सत्ताधाऱ्यांची मतांची झोळी भरणार असा अंदाज आहे.

गरजू महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. 17 ऑगस्टला रक्षाबंधनाला योजनेचा शुभारंभ झाला. नोव्हेंबरचे पैसेही ऍडव्हान्समध्ये जमा झाले आहेत.

योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही आचारसंहिता लागण्यापूर्वी 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुमारे 2 कोटी महिलांना लाभ झाल्याचा दावा सरकारनं केलाय.

योजनेला प्रतिसाद मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांनी भविष्यात लाडक्या बहिणींना मदत वाढवली जाईल, असं आश्वासन दिलंय. दुसरीकडे ही योजना दोन महिन्यांत बंद होणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. महिलांच्या हातांना काम द्या. त्यांना सक्षम बनवा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

एकीकडे या योजनेमुळे मतं मिळतील या आशेने सत्ताधारी सुखावले असले तरी या योजनेवरुन विरोधकांनी सरकारला घेरलंय. तिजोरीत खडखडाट असताना केवळ मतांसाठी योजना आणल्याचा हल्लाबोल मविआच्या नेत्यांनी केलाय. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला होता.

या योजनेमुळे इतर विभागांमधल्या अनुदानाला कात्री लागल्याचं विधानही त्यांनी केलं होतं,. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना तब्बल 46 हजार कोटींची योजना राबवणार कशी अशी चिंता राज्याच्या वित्त विभागानं सतावते आहे. अशी स्थिती असली तरी पैसे जमा झाल्यानं लाडक्या बहिणी खूश आहेत. त्यामुळे महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का हे विधानसभा निकालानंतरच स्पष्ट होणरा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आयुष कोमरच्या हत्येने पुणे हादरले

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT