Devendra Fadnavis | Sanjay Raut  SaamTvNews
महाराष्ट्र

Sanjay Raut: मतदार यादीत सर्वात मोठा घोटाळा, चंद्रशेखर बावनकुळे सुत्रधार, संजय राऊतांचे गंभीर आरोप; निवडणूक आयोगाला इशारा

Maharashtra Assembly Election 2024: दहा हजार नावे मतदार संघातून काढायचे आणि दहा हजार बोगस नाव टाकायचे," असा प्लॅन असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई

Sanjay Raut On BJP: "राज्यातील मतदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. भाजप बुडत आहे, ते पराभवाच्या खाईत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका जिंकता याव्यात म्हणून भारतीय जनता पक्ष मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"आमची बैठक सुरू असताना एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाविरोधात जनमत असल्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करायला लागले आहे. भारतीय जनता पक्ष ज्या भागात लढणार आहे त्या भागात हे घोटाळे होणार आहेत. शिंदे गट, अजित पवार गटाला यामधून बाजूला ठेवले आहे. भारतीय जनता पक्ष ज्या भागात लढणार आहे, जे पक्के मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दहा हजार नावे मतदार संघातून काढायचे आणि दहा हजार बोगस नाव टाकायचे," असा प्लॅन असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

"बीजेपीतले चार प्रमुख नेते या घोटाळ्याचे प्रमुख आहेत. त्यातील एक राज्यपाल नियुक्त आमदार आहे तो या सर्वांचा सूत्रधार आहे. चंद्रशेखर बावनकुळेही यामागचे प्रमुख सुत्रधार आहेत, त्यांनी याबाबत नागपूरमध्ये ट्रेनिंग शिबिरही घेतले, असा दावाही संजय राऊत यांनी केला. तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाही तुम्ही मर्द असाल तर लोकशाही मार्गाने आमच्यासमोर उभे रहा आणि निवडणुका जिंकून दाखवा हरियाणाला आणि झारखंडला तेच केलं आणि आता महाराष्ट्रात सुद्धा तेच करणार..." असा टोलाही राऊतांनी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काल साधारण दहा तास बैठक झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता हा मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, नेत्यांची चर्चा करावी लागेल. आम्ही सगळे मातोश्रीला जाणार आहोत.. असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT