Mahayuti Seat Sharing Formula Saamtv
महाराष्ट्र

Assembly Election: महायुतीची पत्रकार परिषद! शिंदे सरकारकडून 'रिपोर्ट कार्ड' सादर; विरोधकांवर निशाणा, वाचा महत्वाचे मुद्दे

Mahayuti Seat Sharing Formula: निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे, मुंबई

Mahayuti Press Conference On Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्वाची पत्रकार परीषद पार पडली. यावेळी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.

अजित पवार काय म्हणाले?

"आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. महायुतीने तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली. लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. काही तरी बोलायचं आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचे काम सुरु आहे. सुटसुटीत दोन पानांचं हे रिपोर्ट काढले आहे. हा बदलाचा अहवाल आहे. आमच्या मेहनतीचा हा लेखाजोखा आहे. आमचे विरोधक थोडे गडबडले आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा!

"आमच्यासाठी विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे तर विरोधकांसाठी ऐलान झाले आहे. स्थगिती सरकार गेल्यानंतर राज्यात गती आणि प्रगतीचे सरकार आले. महायुती सरकारने सर्व क्षेत्रात विकासकामे केली. अनेक परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे काम महायुती सरकारने केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

"ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला, ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे देत आहेत. जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही महिलांना मदत करु त्यांना सुरक्षितही ठेऊ. विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही घटना झाल्या की तात्काळ कारवाई होते. महायुती सरकारने प्रचंड काम केले आहे," असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

रिपोर्ट कार्ड काढायला हिंमत लागते: CM शिंदे

एका रिपोर्ट कार्डमध्ये बसणार नाही, एवढे काम महायुती सरकारने केले आहे. रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी हिंमत लागते, काम करावे लागते. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. पायाभूत सुविधांमध्ये आज महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड सारखे प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण केले. महायुती सरकारचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

SCROLL FOR NEXT