Harshvardhan Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'पितृपक्षानंतर मोठा निर्णय...', हर्षवर्धन पाटलांचं ठरलं; अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं

Gangappa Pujari

Indapur Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून महायुती तसेच महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकांची काही दिवसात घोषणा होण्याची शक्यता असताना महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्याने भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच अनेकजण बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये महाभारत पाहायला मिळत आहे. इंदापूर विधानसभेवर सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. मात्र या जागेवरुन भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटीलही लढण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकांवेळी अजित पवार यांनी ही जागा भाजपला सोडण्याचा शब्द दिला आहे, असा दावा हर्षवर्धन पाटील करत आहेत. मात्र अजित पवार सातत्याने दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर करत आहेत.

त्यामुळेच नाराज असलेले हर्षवर्धन पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशातच आता हर्षवर्धन पाटलांनी एक महत्वाचे विधान केले आहे. एवढा पंधरावडा जाऊ द्या, मग मोठा निर्णय घेणार असं ते म्हणालेत. या विधानसभेला जनतेच्या मनामध्ये जे आहे, तोच निर्णय घेणार असे सूचक संकेतही हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. मागील महिन्यांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली होती, तसेच दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली होती. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता हर्षवर्धन पाटलांनी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने अजित पवार गटासह दत्तात्रय भरणे यांचीही धाकधुक चांगलीच वाढली आहे. आता हर्षवर्धन पाटील नेमका कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: दोन महिन्यानंतर हे भाऊ सावत्र होतील; लाडकी बहिणी योजेनेवरून बच्चू कडू यांची कोपरखळी

Pimples Problem: चेहऱ्यावर 'हा' पदार्थ वापल्यास पिंपल्सच्या समस्या होतील दूर....

'Stree 2' Aaj Ki Raat Song: 'स्त्री 2'मध्ये 'आज की रात' गाण्याची निवड का केली? दिग्दर्शकाने केला खुलासा

Marathi News Live Updates: पुणे, रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अर्लट; पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

Pune school Bus Accident : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT