Assembly Election 2023 Result Saam Digital
महाराष्ट्र

Assembly Election 2023 Result: मोदींचा करिष्मा कायम, चित्रा वाघ ठामपणे बोलल्या; राहुल गांधींवर टीकास्त्र

Assembly Election 2023 Result: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी मोदींचा करिष्मा पुन्हा पाहायला मिळाल्याचा दावा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Assembly Election 2023 Result

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांचे निकाल हाती आले आहेत. त्यात तेलंगणा व्यतीरिक्त ३ राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. निकाल भाजपच्या बाजूने लागला तर हा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी मोदींचा करिष्मा पुन्हा पाहायला मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच मोदींना हरवण्यासाठी विरोधकांनी अनेक डावपेच आखले मात्र जनतेने पुन्हा एकदा मोंदींवर विश्वास दाखवल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान तीन राज्यांमध्ये भाजपने आघाडी घेतलली असून याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रामभक्तीगीतांच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्रावाघ पुढे म्हणाल्या, या निवडणुकीत महिलांनी देखील भाजपवर विश्वास दाखवला आहे. देश की गॅरंटी बोले तो नरेंद्र मोदी. राहुल गांधी केवळ फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पनौतीवरून चाललेल्या राजकारणावरही चित्रा वाघ यांनी वक्तव्य केलं आहे. सर्वज्ञानी संजय राऊत यांच्या स्टेटमेंट मनावर घेऊ नका. त्यांना पुढे आणखी झटके मिळण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. संपूर्ण बहुमताने राज्यातील जनतेने आम्हाला पाठींबा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक निवडणुकीत विरोधक ईव्हीएमची रट लावत होते. यावेळी मात्र विरोधकांना हा राग आवळला नाही. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राबवलेल्या योजनांचा देशातील जनतेला फायदा झालेला आहे. त्यामुळे भाजप विजयी होताना दिसत आहे. भाजपला हा अपेक्षित निकाल होता, त्याप्रमाणे निकाल लागला आहे. मोदी, नड्डा, शहा आणि सर्वच कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. या राज्यांची पुनावृत्ती प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT