Shivnika Trust linked to Ashok Kharat faces scrutiny over rapid financial growth and alleged irregularities. 
महाराष्ट्र

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात ४०-४५ राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मोबाईलमधील कोडवर्ड संपर्क, जमीन व्यवहार आणि डॉक्टरांशी संबंधांवर SIT तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Ashok Kharat case political leaders connection SIT probe details : अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि खळबळ उडवणारी माहिती तपासात समोर आली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात दररोज ४० ते ४५ राजकीय नेते असायचे. खरातच्या मोबाइलमध्ये विशेष कोर्डवर्डने आमदार, खासदार, राजकीय नेते अन् प्रसिद्ध लोकांची नावं सेव्ह असल्याचे समोर आले आहे. या माहितीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, राजकीय नेत्यांची नावे खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत विशेष पाहुण्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. खरातच्या मुलीच्या लग्नातील पत्रिका सध्या व्हायरल झाली आहे. त्यात शेलार, पाटील, चाकणकर, नार्वेकर यांच्यासह केसरकर यांचे नाव दिसत आहे.

अशोक खरातच्या 40 ते 45 राजकीय नेते नियमित संपर्कात असल्याची माहिती खात्रालायक सूत्रांनी दिली आहे. भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतही सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाव आहेत. खरात यांच्या मुलीच्या लग्नातील पत्रिकेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, आशिष शेलार, रूपाली चाकणकर, चंग्रकांत पाटील, दीपक केसरकर यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरातने राजकीय नेत्यांचे नाव मोबाइलमध्ये विशेष कोडवर्डमध्ये सेव्ह केली आहेत. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती समोर आली. SIT ला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

रिंग रोडजवळ कोट्यवधींची जमीन -

नाशिक शहरात प्रस्तावित रिंग रोडजवळ खरातकडून कोट्यावधींच्या जमिनीची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील इन्सायडरमुळे ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ समोर आला आहे. नाशिक रिंग रोड मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी-विक्रीचे भूसाम्राज्य आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

रिंगरोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी करण्यात आली आहे. रिंग रोडपासून अगदी जवळ असलेल्या जमिनीची काही ठिकाणी 3–5 पट दराने जमीन खरेदी झाल्याची माहिती मिळाली. जमीन व्यवहारांमध्ये खरातसोबत अधिकारी, राजकीय नेत्यांच्या संगनमताचा संशय, गुंतवणूकदार कोण याचा तपास होणार आहे. जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार उघड, इनसाइड माहिती वापरून आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नामांकित डॉक्टर रडारावर -

नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरही एसआयटीच्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का ? असा संशय व्यक्त केला जातोय. महिलांना संमोहित करण्यासाठी काही मेडिसीनचा वापर केला जात होता का ? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. SIT च्या तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT