Political storm intensifies as new allegations emerge in the Ashok Kharat case. saam tv
महाराष्ट्र

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी चकरा, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Neelam Gorhe Name In Kharat Case : तृप्ती देसाईंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. नीलम गोऱ्हे या देखील खरातच्या संपर्कात होत्या असा आरोप त्यांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • खरात प्रकरणात नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर

  • तृप्ती देसाई यांचे गंभीर आरोप

  • चाकणकरांनंतर आणखी एक नेत्या अडचणीत

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता खरात प्रकरणात शिवसेनेच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंचं नाव समोर येत आहे. नीलम गोऱ्हे या ८ वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला केला आहे. तृप्ती देसाईंच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा केले आहेत. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचे कारण नीलम गोऱ्हे या ७ ते ८ वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आमदारकी व मंत्रीपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेत होत्या, असा खळबळजनक आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये नीलम गो्ऱ्हे आणि खरात याची भेट झाली होती. त्या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या, विधान परिषद किंवा मंत्रिपदासाठी त्या भेट घेत असाव्यात. या भेटीचे फोटो जरी समोर आले नसले तरी त्यांच्या भेटीदरम्यानची लोकं त्यांच्यासोबत होती त्यांनी मला ही माहिती दिली, असा दावा तृप्ती देसाई यांनी केली आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील खरातच्या ऑफिसमध्येही नीलम गोऱ्हे जात होत्या.

ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झालेल्या, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे भेटल्या होत्या.” अशोक खरात हा राजकीय क्षेत्रात सक्रिय होता. अनेक राजकीय नेते, अधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार यांचे नंबर त्याच्याकडे होते. अनेक जण भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत होते, असेही देसाई म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT