Ashok Chavan  Saam TV
महाराष्ट्र

अशोक चव्हाण थेट पाटील कुटुंबीयांच्या भेटीला; 2 वर्षांपुर्वी दिलेला शब्द पाळला

आपला व्हिडीओ अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याची बातमी नागेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली.

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर: ६ जानेवारी २०२० रोजी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ अशोक चव्हाण यांच्या पाहण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये मूळचे कोल्हापूरचे असलेले नागेश पाटील आपल्या नव्या गाडीच्या बॉनेटवर आपल्या दोन वर्षांच्या निहारिका नामक लेकीची कुंकवात भिजलेली पावले उमटवून त्या गाडीची पूजा करत होते. लेकीची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले मानणाऱ्या त्या पित्याची भावना आणि तो व्हिडीओ अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भावला. बाप-लेकीच्या नात्याचा ओलावा अनोख्या पद्धतीने दर्शवणारा तो व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पाहता-पाहता तो प्रचंड व्हायरल झाला. त्यांच्या फेसबुक पेजवर त्या व्हिडीओला तब्बल २८ मिलियन म्हणजे २ कोटी ८० लाख व्ह्युज मिळाल्या आहेत.

आपला व्हिडीओ अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याची बातमी नागेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. या बापलेकीला भेटायला मला आवडेल, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. त्यामुळे नागेश पाटील यांनी रात्री एका मित्राच्या मदतीने अशोक चव्हाणांच्या ट्वीटर हॅंडलवर डायरेक्ट मॅसेज करून आपला फोन नंबर पाठवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील नव्या दालनातून कामकाजाला सुरूवात करणार होते. मंत्रालयात आल्यावर आपल्या कार्यालयातून पहिला फोन त्यांनी नागेश पाटलांना केला. मुलीवरील त्यांच्या प्रेमाचं आणि तिच्या पदचिन्हांनी गाडीची पूजा करण्याच्या अभिनव कल्पनेचं कौतुक केलं. मी जेव्हा-केव्हा कोल्हापूरला येईल, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या मुलीला भेटायला नक्की येईल, असा शब्दही अशोक चव्हाण यांनी त्या संभाषणाच्या वेळी दिला.

त्यानंतर तब्बल सव्वा दोन वर्षांनी ८ एप्रिल २०२२ रोजी अशोक चव्हाण प्रथमच कोल्हापूरला आले. दिलेला शब्द पाळून त्यांनी नागेश पाटील यांना सहकुटुंब भेटीचे निमंत्रण दिले होते. सुमारे २० मिनिटांच्या या भेटीत अशोक चव्हाण यांनी पाटील कुटुंबाची विचारपूस केली. आता चार वर्षांची झालेल्या निहारिकालाही कडेवर घेत तिच्याशी संवाद साधला. नागेश पाटील हे वाहन चालक असून, नोकरीनिमित्त सध्या ते पुण्यात आहेत. तर त्यांचे वडील चांदोली धरणावर चौकीदार म्हणून काम करतात. या हृदयस्पर्शी भेटीनंतर अशोक चव्हाण आणि पाटील कुटुंब दोहोंच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, शिंदे-फडणवीस नेमकं काय करणार?

SCROLL FOR NEXT