Ashok Chavan Saam TV
महाराष्ट्र

Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे कोणते आमदार पक्ष सोडणार? 'ही' नावं आली समोर

11 MLA Possibility to Resign: अशात ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे. यावरून काही आमदारांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

Political News:

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी ही मोठी खिंडार माणली जात आहे. अशात ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे ते ११ आमदार कोणते? यावरून काही नावांची मोठी चर्चा रंगलीये.

अशोक चव्हाण यांच्यासोबत हदगाव हिमायतनगर विधानसभा मदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नांदेड ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील.

तसेच नांदेड (Nanded) दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे आणि देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर, परभणी पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर, पुणे भोरचे आमदार संग्राम थोपटे. लातूर ग्रामीणचे धीगज देशमुख, लातूर शहर अमित देशमुख, पलुस कडेगाव डॉ. विश्वजीत कदम, रिसोड अमित झनक, नागपूर पश्चिम विकास ठाकरे या ११ नावांची चर्चा होत असून. हे आमदार काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यादी

१. धुळे ग्रामीण कुणाल पाटील (काँग्रेस)

२. हदगाव माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)

३. नांदेड दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)

४. देगलूर जितेश अनंतपूरकर (काँग्रेस)

५. पाथरी सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)

६. भोर संग्राम थोपटे (काँग्रेस)

७. लातूर ग्रामीण धीरज देशमुख (काँग्रेस)

८. लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस)

९. पलुस कडेगाव डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)

१०. रिसोड अमित झनक (काँग्रेस)

११. नागपूर पश्चिम विकास ठाकरे (काँग्रेस

यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अद्याप या सर्व आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशोक चव्हाणांना कोणतं मंत्रिपद मिळणार?

अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. तसेच अन्य ११ आमदारांना देखील मंत्रीपद दिले जाईल अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांना मंत्रीपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT