लातूर : मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सक्षम केले आणि नागरिकांचे प्राण वाचवले. मात्र, काहींनी केवळ राज्य सरकारवर टीका करण्याचे काम केले. नागरिकांनी लस (Vaccine) घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा (PM Modi) फोटो येतो, लसीकरणातही त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे. मात्र, आम्ही कधीही कोणाचे फोटो लावले नसल्याची टीका नाव न घेता भाजपवर (BJP) केली आहे.
हे देखील पहा :
आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभासाठी आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), मंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख आमदार विक्रम काळे, आमदार अमरनाथ राजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लातुर जिल्ह्यात 526 कोटी रुपयांची 152 कामे आठशे 80 किलोमीटर लांबीच्या कामांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारने केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी अन्य विकासकामे बाजूला ठेवून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले. रस्ता उशिरा झाला तरी हरकत नाही; पण, सरकार लोकांचे प्राण वाचवू शकत नसले तर काय कामाचे असा सवाल करत चव्हाणांनी विरोधकांच्या कानपिचक्या घेतल्या.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.