Ashish Deshmukh Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

Ashish Deshmukh Suspended: पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Ashish DeshmuKh News: काँग्रेसचे बंडखोर नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता आशिष देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

आदेश पत्र जशेच्या तसे...

आपण आपल्या पक्षाविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणात लागू होतात. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षाच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच तुम्हाला सहा वर्षासाठी निष्काषित करण्यात येत असल्याचं निष्कासन आदेश पत्रात म्हटलं आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT