Akola News: दोन हजार नोटेची काढली अंत्ययात्रा; अकोल्‍यात राष्ट्रवादीकडून निषेध

दोन हजार नोटेची काढली अंत्ययात्रा; अकोल्‍यात राष्ट्रवादीकडून निषेध
Akola News NCP
Akola News NCPSaam tv
Published On

अकोला : दोन हजार रूपयांची नोट बंद केल्‍याने आता ही नोट बदलविण्यासाठी नागरीकांची लगबग आहे. मात्र या नोट बंदच्‍या निर्णयाचा निषेध केला जात आहे. यात आज (Akola) अकोला येथे राष्‍ट्रवादीच्‍यावतीने (NCP) दोन हजाराच्‍या नोटेची अंत्‍ययात्रा काढण्यात आली. (Live Marathi News)

Akola News NCP
Samruddhi Mahamarg Accident: भीषण अपघात..एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू; अंत्‍यविधीवरून परतताना काळाची झडप

सरकारने ६ वर्षापूर्वी नोटबंदी करून दोन हजार रूपयांची नोट छापत चलनात आणली होती. यानंतर आता रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट बंद केल्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्‍या या निर्णयाबाबत अनेकांकडून टीका होत आहे. विरोधी राजकीय पक्षांकडून निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. त्‍यानुसार अकोल्‍यात देखील राष्‍ट्रवादीकडून निषेध नोंदविण्यात आला.

Akola News NCP
Jalgaon Crime News: भरदिवसा सिनेस्टाईल लुटले; डोळ्यात मिरचीपुड टाकून अडीच लाख लंपास

दोन हजाराची नोट बंदच्‍या निषेधार्थ आज अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्य भवन येथून ओपन थिएटर ते गांधी चौक पर्यंत दोन हजारच्या नोटेची अंतिम यात्रा काढून निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com