ashadi vari viral video facebook
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Wari : इवलीशी पावले चालती पंढरीची वाट! ११ महिन्यांची चिमुकली राधा विठुरायाच्या भेटीला; VIDEO पाहायलाच हवा..

Ashadhi wari Viral Video: या वारीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

11 Month Old Girl Radha Mali Walk In Wari : वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरच्या वारीला जातात. पैसा ,पद प्रतिष्ठा ,जातपात याचा विचार न करता भेटीलागी जीवा लागलीसे आस | पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ...असं म्हणून भाविक विठूरायाच्या भक्तीत दंग होतात. दरम्यान या वारीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वारीत सहभागी झाल्यावर वय विसरणारे कित्येक आजी-आजोबा तुम्ही पाहिले असतील. पण अवघ्या ११ महिन्यांची चिमुकली सुद्धा वारीत विठूरायाच्या भक्तीत दंग झालेली पाहायला मिळाली आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वारीत पायी चालणाऱ्या या चिमुकलीचं नाव आहे राधा माळी. राधाच्या घरी अनेक वर्षांपासून वारीची परंपरा आहे. राधाचे वडील ज्ञानेश्वर माळी हे कीर्तनकार आहेत. तर पेशाने आयटी इंजिनिअर असणारी राधाची आई देखील वारकरी आहे. अशा वारकऱ्यांच्या कुटुंबात गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी चिमुकल्या राधाचा जन्म झाला आहे.

अवघ्या ११ महिन्यांच्या राधाने आपल्या कुटुंबासोबत पंढरीची वाट धरली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी राधाचा पहिला वाढदिवस देखील पंढरपुरात मोठ्या जल्लोशात साजरा केला जाणार आहे. (Viral Video)

राधाच्या वडिलांचं म्हणणं आहे की, 'माझ्या घरी आषाढी एकादशीला मुलगी जन्माला आली आहे, म्हणजे जणू रखुमाईनेच आमच्या घरात जन्म घेतला आहे. मग विठुरायाला भेटायला जात असताना तिला का सोबत नेऊ नये ? हेच कारण आहे की मी माझ्या ११ महिन्यांच्या राधाला घेऊन पांडुरंगाच्या भेटीला निघालो आहे.

मला खूप लोकं असे म्हणत आहेत की, तु्म्ही इतक्या उन्हात लहान मुलीला घेऊन का चालताय. पण ज्याच्या डोक्यावर विठूचा हाथ आहे त्याला काहीही अशक्य नसत.' अंस उत्तर राधाच्या वडिलांनी दिलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की,' जेव्हा ऊन कमी असतं तेव्हा राधा वारीमध्ये बाबा गाडीत बसते. कधी कधी आजीच्या बोटाला धरून चालते तर. तर ऊन वाढलं की चार चाकी गाडीतून प्रवास करते. पण सध्या पंढरीच्या वाटेवर चालत असणाऱ्या लाखो वारकऱ्यांमध्ये ११ महिन्यांची राधाची वारी हा चर्चेचा विषय बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

Virar Politics : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; बविआ आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

SCROLL FOR NEXT