Ahmednagar Police  सचिन आगरवाल
महाराष्ट्र

लष्करात अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला अटक

लष्करात भरती करतो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक करणारा तोतया लष्करी अधिकारी नवनाथ गुलदगड, राहणार राहुरी यास स्थानिक पोलीस पथकाने पकडले आहे.

सचिन आगरवाल

अहमदनगर - लष्करात (Army) भरती करतो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक करणारा तोतया लष्करी अधिकारी नवनाथ गुलदगड, राहणार राहुरी यास स्थानिक पोलीस (Police) पथकाने पकडले आहे. लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या दक्षिण कमांड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या सैयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नवनाथ गुलदगड हा काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीवर कमांडो असे लिहून राहुरी, संगमनेर (Sangamner) परिसरात फिरत होता. तेथील तरुणांना लष्करात भरती करून देतो असे आमिष दाखवायचा.

हे देखील पहा -

काही तरुण त्याच्या गणवेशाचा, त्याच्या खोट्या बोलण्याला भुलायचे . ही माहिती लष्कराच्या इंटेलिजन्स ब्युरोला मिळाली. लष्कराने ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली. या माहितीच्या आधारे सैयुकत करावी करत संगमनेर तालुक्यातील मांडवा गावात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याने आपण लष्करात बंगळूरला असल्याचे सांगून ओळख पत्र दाखवली. परंतु त्या ठिकाणी लष्कराची इंटेलिजन्सची टीम देखील असल्याने त्यांनी तातडीने खात्री केली असता असा कुठला ही व्यक्ती लष्करात अधिकारी नसल्याचे उघड झाले.

तसच राहुरी येथे फसवणूक झालेल्या एका तरुणाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात नवनाथ गुलदगड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देखील दखल झाला आहे. त्याच बरोबर राहुरी, संगमनेर या परिसरातील ज्यांची कोणाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाली असेल अशा तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन देखील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT