Aurangabad Police Station Saam Tv
महाराष्ट्र

समलिंगी मैत्रिणींमधील वाद ब्रेकअपनंतर थेट पोलीस ठाण्यात

ही घटना औरंगाबाद शहरात घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - समलिंगी मैत्रिणींमध्ये ब्रेकअपनंतरचा वाद इतका विकोपाला गेला की दोघींनाही थेट पोलीस ठाण्यात जावं लागलं. ही घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील क्रांती चौक पोलिसांनी (Police) दोघींनाही समजावून सांगून प्रकरण मिटवले, शिवाय यापुढे एकमेकांना त्रास होणार नाही, असं वर्तन करणार नसल्याचे लिहूनही घेण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी औरंगाबादमधील दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये प्रेम बहरले. आनंदाने नाते फुलतही गेले. मात्र, काही काळानंतर एकीला हे नाते नकोसे झाल्यानं ती दूर गेली. त्यामुळे दुसरीला ते सहन झाले नाही. दोघींमधील वाद एवढे वाढले की दुसरीने नाते कायम राखण्यासाठी आत्महत्येची, दोघींची विशिष्ट छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली.

हे देखील पहा -

त्यानंतर त्या दोघींचा वाद औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहाेचला. पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. २१ वर्षीय दोघीजणी एकाच वसाहतीत राहतात. काॅलेजमध्ये शिक्षण सुरू झाल्यानंतर त्यांच्यातील ओळख वाढली. हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. नंतर रोज भेटू लागल्या. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या नात्यात झाले. मात्र, अलीकडे दोघांचे भांडण विकोपाला गेले.

क्रांती पोलीस ठाण्यात सहसा खून, हाणामारी, मोठ्या चोऱ्या किंवा फसवणुकीच्या तक्रारी येतात. त्यामुळे उच्च वर्गातील दोन तरुणींचे प्रेमप्रकरण आणि त्यातून गुन्हा घडण्याची दाट शक्यता असे प्रकरण समोर येताच पोलीस अधिकारी काही काळ थोडेसे चक्रावले होते. थेट कारवाईऐवजी पाेलिसांनी आधी समजावून सांगितले. शिवाय लिहून घेतले, मग दोघींनी मान्य करून आपला रस्ता धरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली

भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीही भाजपचाच निघाला; राज्यात खळबळ

Dosa Recipe : मुलं दुधी भोपळा खात नाहीत? मग 'असा' बनवा कुरकुरीत डोसा, एकदा चव चाखताच पुन्हा पुन्हा मागतील

मोठी बातमी! विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली, अविनाश रणखांब यांच्याकडे नवीन जबाबदारी

SCROLL FOR NEXT