Aurangabad Pipeline Broke
Aurangabad Pipeline Broke माधव सावरगावे
महाराष्ट्र

Aurangabad News: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, पाहा Video

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Aurangabad Latest News: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली आहे. त्यामुळे जुन्या शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. औरंगाबाद (Aurangabad) जुन्या शहराची तहान भागविणारी ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (Pipeline) शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास फुटली. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीव्हीआर कंपनीच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्याचे समोर आले आहे. (Aurangabad Pipeline Broke)

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यासाठी किमान ३० तास लागणार असून, नागरिकांना किमान दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल. जुन्या शहरासाठी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी, तर नवीन सिडको शहरासाठी १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. दोन्ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या असून, किंचित धक्का लागला तरी जलवाहिनी फुटते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.

पाहा व्हिडिओ -

मागील दीड महिन्यात तब्बल पाच वेळा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पैठण रोडवरील कवडगाव येथे ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर व शेतात वाहू लागले आणि वाया गेले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT