सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई
Polluted Water In Vashi: स्मार्ट सिटी म्हणून लौकिक मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नवी मुंबईच्या वाशी (Vashi) परिसरात एक नाल्यामध्ये दुर्गंधीयुक्त लाल, गुलाबी रंगाचे पाणी वाढले आहे. एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून नाल्यात दूषित पाणी सोडले जात आहे. (Vashi Latest News)
यामुळे वाशी आणि कोपरखैरणे दरम्यान असलेल्या नाल्यात गुलाबी, लालसर रंगाचे दूषित पाणी पाहायला मिळतेय. नाल्यात पूर्णतः गुलाबी, लालसर असे दूषित पाणी (Polluted Water) दिसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र वास पसरला आहे.
हे दूषित पाणी वाशी लगतच्या महापे, कोपरखैरणे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमधून सोडण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या रात्रीच्या वेळी आणि पहाटे दुषित पाणी नाल्यांमध्ये सोडत असल्याचे समोर आले.
याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला (Maharashtra Pollution Control Board) मिळताच घटनास्थळी जाऊन पथकाने दुपारी तीन वाजता पाहणी केली. या दूषित गुलाबी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून आता प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.