Shirdi News Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi News: शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता, मात्र जिल्हा विभाजनाचं काय?

Latest Marathi News: कार्यालय जिल्हा विभाजनाची नांदी ठरणार असल्याच्या चर्चा

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Ahmednagar News Today: राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात आता दोन जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहेत. राज्य सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील नागरीकांची ससेहोलपट थांबणार आहे. मात्र या निर्णयामुळे भविष्यात अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन शिर्डी हा स्वतंत्र जिल्हा होणार असा अंदाज लावला जातोय. त्यामुळेच आता या विषयावरून राजकारण सुरू झाला आहे.(Latest Marathi News)

क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन केले जावे हि अनेक दशकांपासून मागणी आहे. मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी हा प्रश्न राजकीय केल्याने श्रीरामपूर की संगमनेर? या वादात अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे विभाजन रखडले आहे.

त्यात विखे पाटलांनी श्रीरामपूर आणि संगमनेर सोडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीसाठी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील नागरीकांना जिल्हाधिका-यांशी संबधित कामे मार्गी लावण्यासाठी शिर्डीत यावे लागणार आहे. अनेक वर्षांपासून आम्ही श्रीरामपूर जिल्हा व्हावा हि मागणी करत असताना सरकारने घेतलेल्या निर्णयाचा श्रीरामपूर काँग्रेसचे नेते करण ससाणे यांनी विरोध केला आहे.

काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) गेली अनेक वर्ष महसुलमंत्री होते त्यावेळी त्यांनी हे कार्यालय संगमनेर किंवा श्रीरामपूरमध्ये का सुरू केले नाही? असा सवाल उपस्थित करत केवळ शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले म्हणून लगेच शिर्डी जिल्हा होणार हा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटल आहे.

साईबाबांची शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ म्हणून उदयास आली आहे. शिर्डीत रेल्वेस्टेशन, विमानतळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. यांसह परीसरात असलेली शासनाची मुबलक जमिन यामुळे शिर्डी जिल्हा होण्याची जास्त शक्यता आहे. इतर तालूक्यांसाठीही शिर्डी मध्यवर्ती असल्याने शिर्डी जिल्हा होण्यासाठी नव्याने सुरू होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय महत्वपूर्ण ठरणार आहे.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत होत असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरा सोबतच विभाजनाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यामुळे शिर्डीत झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनाची नांदी ठरणार का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT