anticipatory bail rejected of sharad pawar faction ncp leader rahul shah Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Faction : शरद पवारांच्या गाेटातील नेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, 'ते' प्रकरण भाेवणार?

राहूल शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

पंढरपूर जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) मंगळवेढा येथील राष्ट्रवादीे काॅंग्रेसचे नेते राहुल शहा (rahul shah mangalvedha) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. शहा हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस गटातील आहेत. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Maharashtra News)

मंगळवेढा येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याच्या आराेप राहूल शहा यांच्यावर आहे. या प्रकरणात शहा यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात शहा यांनी अटक टळावी यासाठी पंढरपूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल होता. जिल्हा सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल यांनी शहा यांचा अर्ज नामंजूर केला.

सरकार पक्षाकडून वकील सारंग पाटील , वकील दत्तात्रय गोरे तसेच फिर्यादी यांच्याकडून वकील भारत पवार , वकील धनंजय हजारे तर राहुल शहा यांच्याकडून वकील शशी कुलकर्णी, , ओमकार गुरुकुल, शशांक कुलकर्णी, विश्वास देशमुख यांनी काम पाहिले.

रमेश जाेशींनी दाखल केली हाेती फिर्याद

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या श्री विद्या विकास मंडळ या शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभा व अहवालाबाबत राहुल शहा, अध्यक्षा शुभदा शहा, सचिव किसन गवळी, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी संस्थेचे सचिव रमेश जोशी, संचालक डॉक्टर अशोक सुरवसे यांच्या बोगस सह्याकरून अहवाल सादर केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांनी जोशी यांच्या तक्रारीनूसार (कलम 420,467,468,471,34) मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT