Maratha protesters celebrate victory with Gulal as Manoj Jarange’s Mumbai protest secures major success in reservation battle." Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: जीआर निघाला, जरांगे जिंकले, जरांगेंच्या मुंबईतील लढ्याला मोठं यश

The Journey of Jarange’s Mumbai Protest: आंतरवाली सराटी ते मुंबई अशी जरांगेंच्या आंदोलनाची लढाई नेमकी कशी होती? जरांगे मुंबईत आल्यावर काय घडलं? विजयाचा गुलाल माथी लागण्याआधी आंदोलकांसोबत काय घडलं?

Omkar Sonawane

मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं निघालं.. जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिला आणि हजारो मराठ्यांनी मुंबईची वाट धरली.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा गावाकडं जायचं नाही, हाच निर्धार मराठा आंदोलकांनी केला. मात्र हजारो मराठ्यांना घेऊन मुंबईत धडकण्याची रणनिती ठरली. मात्र आंदोलन सुरु होण्यापूर्वी हायकोर्टानं मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली. आणि नवी मुंबईचा पर्याय दिला. मात्र जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम होते.

जरांगेंनी पुन्हा कोर्टात धाव घेतली आणि त्यांना पाच हजार आंदोलकांसह आझाद मैदानात केवळ एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मिळाली आणि जरांगेंचा मुंबईत जाण्याचा मार्ग मोकळा झाला..सुरू झाला आंतरवाली ते मुंबईचा हजारो आंदोलकांसोबतचा प्रवास आणि आरक्षण लढ्याचा पार्ट - टू...

जरांगेंच्या याचं घोषणेनंतर मराठ्यांनीही कंबर कसली.. कुठल्याही परिस्थिती मुंबई राहायचं आणि आरक्षण मिळवूनच परतायचं.. हीच खुणगाठ त्यांनी बांधली..सीएसएमटी स्थानक, आझाद मैदान सगळीकडे मराठ्यांनी एकच जल्लोष केला.. सरकारनं आंदोलकांची कोंडी केल्यांचा आरोप करून आंदोलकांनीही रस्त्यावर उतरत सरकारला खुलं आव्हान दिलं.

दरम्यान नियमाचं उल्लघंन केल्याचा आरोप करत मराठा आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाली.. कोर्टानं जरांगेंना अल्टीमेटम दिलं.. मात्र तरीही आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे ठाम राहिले.. त्यात आंदोलकांनी सरकारविरोधात रान उठवल्यानं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा वेग वाढवला.. जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवस सलग बैठका झाल्या वेगवेगळ्या शक्यता तपासण्यात आल्या आणि अखेर मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या.. विशेष म्हणजे या मागण्या त्यांनी भर मंचावर मंत्र्यांच्या तोंडून वदवून घेतल्या.

2011 पासून वेळोवेळी जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यात आता मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावर जरांगेंनीही लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडलं.. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले..

आता मराठ्यांच्या उर्वरित मागण्या कधी मान्य होणार? सरकार जरांगेंना दिलेलं आश्वासन कसं पूर्ण करणार? याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

SCROLL FOR NEXT